Marathi Ukhane मराठी उखाणे : In this article you will find Marathi ukhane for male, Marathi ukhane for female, Marathi ukhane for male funny, नवरी साठीचे उखाणे, नवरदेवाचे उखाणे, गमतीदार उखाणे, चावट उखाणे, गृहप्रवेश उखाणे, मकरसंक्रांती साठीचे उखाणे अशे सर्व नवीन उखाणे आपल्या साठी घेऊन आलो आहोत.

Marathi Ukhane
माहेर तसं सासर, नातेसंबंधही जुने ….राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.
तिळगुळाच्या संक्रांतीला, जमतो स्वादिष्ट मेळ ….रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ.
रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा ….रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा.
सोसायट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, .…रावांचे नाव घेते आणि वाटते तीळगूळ.

उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव आज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव.
संसाररूपी वेलीचा, गगनात गेला झुला .…रावांचे नाव घेते , आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला.
तीळगुळाच्या देवघेवीने, दृढ जुळते नातं ….रावांचे नाव घेते, आज मकर संक्रांत.
सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात ….रावांचे नाव घेते, ….च्या घरात.

Marathi Ukhane For Female
आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा ….रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.
उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव आज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव.
संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी ….रावांमुळे आली , माझ्या आयुष्यात गोडी.
मोत्याची माळ, सोन्याचा साज ….रावांचे नाव घेते, मकर संक्रांंतीचा सण आहे आज.

गोऱ्या गोऱ्या हातावर, रेखाटली मेंदी ….रावांचे नाव घेण्याची, नेहमी मिळो संधी.
संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात ….रावांचे नाव ऐकायला बसले सगळे प्रकाशात.
पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये , वाढले लाडू पेढे .…रावांचे नाव घेताना, कशाला इतके आढेवेढे.
दोन जीवांचे मीलन जणू, शतजन्माच्या गाठी …रावांचे नाव घेते , तुम्हा सर्वांसाठी!

तेल लावून, कंबर माझी मोडली, पाडव्याची ओवाळणी पाहता, कळी माझी खुलली.
सासरची छाया, माहरेची माया, ….राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया.
गुढी पाडव्याच्या सणाला, कडूलिंबाचे पान …रावांचे रूप पाहून, झाले मी बेभान.
मंगळसूत्रातील दोन वाट्या, सासर आणि माहेर .…रावांनी दिला मला, सौभाग्याचे आहेर.

बहिणासारख्या नणंदा, भावासारखे दीर ….रावांचे नाव घ्यायला, पाडव्याला झाले मन अधीर.
हिरव्या साडीचा, पिवळा काठ भरजरी, .…रावांचे नाव घेतल्यावर, चेहऱ्यावर येते तरतरी.
माहेरची माया आणि माहेरची साडी .…रावांची आणि माझी पाडव्याच्या दिवशी जमली.
पैठणीवर शोभते, नाजूक मोरांची जोडी .…रावांमुळे आली, आयुष्याला गोडी.

नववर्षाच्या शुभारंभासाठी येतो पाडवा .…रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा.
चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा, .…रावांचे नाव घेते, आशिर्वाद तुमचा सर्वांचा.
घातली मी वरमाला, …रावांच्या गळी पाडव्याच्या दिवशी येते गालावर लाली.
सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, .…रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.

जीवनरूपी कादंबरी वाचली आम्ही दोघांनी पाडव्याच्या दिवशी….रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं ….रावांचे नाव, माझ्या मनात कोरलं.
इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून .…रावांचं नाव घेते….ची सून.
नंदवनात असतात सोन्याची केळी ….रावांचे नाव घेते पाडव्याच्या सणाच्या वेळी.
Read More: वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा Birthday Wishes In Marathi

शेल्याशेल्याची बांधली गाठ .…रावांचे नाव मला अगदी तोंडपाठ.
सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही .…रावांचे नाव पाडव्याच्या दिवशी ओठावर येई.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने मंगळागौरीच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी …रावांचे नाव घेते, पाडवा सणासाठी!

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, …रावांचे नाव घेते देवापुढे.
ससाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा …रावांचे नाव घेऊन, आशिर्वाद मागते सौभाग्याचा.
सूर्यबिंबाचा कुमकुमतिलक, पृथ्वीच्या भाळी …रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी.
जडवाचे मंगळसूत्र, सोन्याने मढविले …रावांचे नाव घेण्यासाठी, इतके का अडविले.

बारीक मणी घरभर पसरले …रावांसाठी मी माहेर विसरले.
सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात, …रावांचे नाव घेते, आता सोडा माझी वाट.
गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी ….रावांचे नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी.
कपाळाचं कुंकू, जसा चांदण्याचा ठसा …रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाला बसा.

सुखसमाधान तिथे जिथे लक्ष्मीचा वास मंगळगौरीच्या दिवशी देते….रावांना जिलबीचा घास.
सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह ….रावांचे नाव घेण्यासाठी, नको मला आग्रह.
महिन्यात असते कधी पुनव कधी अवस ….रावांचे नाव घेते, आज मकर संक्रांतीचा दिवस.
मंगळागौरी माते, नमन करते तुला. ….रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला.

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी. ….रावांचं नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी.
गजाननाची कृपा, गुरूंचा आशिर्वाद. …रावांचे नाव घ्यायला मंगळागौरीच्या दिवशी करते सुरुवात.
संसाराच्या सागरात प्रीतीच्या लाटा. ….रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा.
नाव घ्या नाव, सगळे झाले गोळा,
….रावांचं नाव आहे, एक लाख रूपये तोळा.

बागेमध्ये असतात, गुलाबाच्या कळ्या
…रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या.
चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा
मी आहे म्हैस तर…राव आहेत रेडा.
रेशमाचा सदरा, त्याला प्लास्टिकचे बक्कल
आमचे…राव आहेत हँडसम, पण डोक्यावर मात्र टक्कल.
उंच उंच डोंगर हिरवे, त्याला टेकतं आभाळ,
….रावांचे नाव काय घेऊ…कपाळ???

पुरणपोळीत तूप असावे ताजे आणि साजूक
आमचे….राव तर आहेत खूपच नाजूक.
एक होती चिऊ, एक होता काऊ
….रावांचे नाव घेते, आता डोकं नका खाऊ.
नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
….. च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते.
लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
……….चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.

Best Marathi Ukhane For Male
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,…….
च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. …
चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, …
बरोबर बांधली जीवनगाठ.
उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार …
च्या गळ्यात.

सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …..
मला मिळाली आहे अनुरूप.
प्रसन्न वदनाने आले रविराज, …
ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.
जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, …
च्या सहवासात झालो मी धुंद.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……
चे नाव घेतो सर्वजण ऐका.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..
झाली आज माझी गृहमंत्री.
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, …
चे नाव घेऊन सोडतो कंकण.
काट्यात काटा गुलाबाचा काटा,
…. नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
…. चे नाव घेतो ऐका देऊन कान.

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,
…. ला घास भरवतो वरणभात तूपाचा.
ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,
तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.
कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
…… च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
हा दिवस आहे आमच्याकरिता खास,
…. ला देतो गुलाबजामचा घास.

परातीत परात चांदीची परात,
…. लेक आणली मी …. च्या घरात.
…. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल,
तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल.
सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,
…. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात.
उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल.

नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
…. च्या घराण्यात … रावांची झाले महाराणी.
गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,
…. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती.
आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,
…… रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश.
सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,
….. राव मला मिळाले आहेत ते अनुरूप.

मानसरोवरात राजहंस मोती भक्षी,
……राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी.
आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल,
….. रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल.
मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण,
…. रावांचे नाव घेते …. ची मी सून.
मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस,
….रावांचा संसार हा सुखाचा कळस.

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,
…. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी.
सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,
….. रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा.
लग्नाच्या पंगतीत, घेतला उखाणा खास,
आणि …. रावांच्या घशात अडकला घास.

लग्नात लागतात हार आणि तुरे,
…. रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,
…. रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,
अशीच राहु दे माझी व ….. रावांची प्रेम ज्योती.

चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा,
….. रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा.
बारिक मणी घरभर पसरले,
….. रावांसाठी माहेर विसरले.

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
….. रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले.
सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण,
…..रावांचे नाव घेते ऐका सारेजण.

ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
…..रावांचे नाव घेते …..च्या दिवशी.
मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,
….. रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल.
पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला,
….. रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला.

मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर-माहेरचा संगम,
….. रावांच्या सहवासात माझ्या आनंदाचा उगम.
मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला,
….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.
लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
…..रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात.

एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,
….. रावांची सारी माणसे मी आपली मानली.
मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
….. रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.
रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
….. रावांना भरविते मी प्रेमाचा घास.
तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
….. रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात.
काढ्यात काढा पाटणकर काढा,
….. रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा.

इन्द्रधनुष्य दिसतो, जेव्हा असतं पावसात ऊन,
….. रावांचे नाव घेते—— ची मी सुन.
अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
….. रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना.
सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,
….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी.

सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
….. रावांचे नाव घेते ….. ची सून.
हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
….. रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत.
सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
….. रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश
….. रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश.
अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
काल होते मी युवती, आज झाले ….. रावांची सौभाग्यवती.
सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान,
….. रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान.
सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,
….. रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात.

शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
….. रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता.
आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
….. रावांना भरविते जिलेबिचा घास.
जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
….. रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद.
झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,
….. राव सुखी रावो हीच आस मनाची.
प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण,
….. रावांचे नाव घेऊन सोडले काकण.

तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी, नक्की या जुळताना,….. आणि ….. च्या रेशीमगाठी.
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही, …..सारखा हिरा.
चंदनी पानात मुग्ध कळी हसली, ….. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती, ….. ची व माझी जडली प्रिती.
वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल, ….. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

परसात अंगण, अंगणात तुळस, ….. नाव घ्यायचा मला नाही आळस.
काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन, ….. च्या साह्याने सुखी झाले जीवन.
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, ….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
फुलासंगे मातीस सुवास लागे, ….. रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.
झेंडूचे फुल हालते डुलू डुलू,
आमचे …..राव असे दिसतात जसे डुकराचे पिलू
डाळीत डाळ तुरीची डाळ
…..हिच्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ
गोव्याहून आणले काजू
…..रावांच्या थोबाडीत द्यायला मी कशाला लाजू
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
… घरी परतले नाहीत अजून, कुठे पिऊन पडलेत की काय!!!
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
… माझी बायको आहे मोठी लुच्ची

Romantic Ukhane For Male
कश्मिरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध,
….. च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद,
नीलवर्णी आकाशातून पडती पावसाच्या सरी,
……चं नाव घेतो……च्या घरी.
हळद असते पिवळी, कुंकु असते लाल, ….. रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल.
आवडतं सर्वांना पुढचं पाऊल, ….. चं नाव घेते कुंकू लावून.
मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण …. सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण.
औषधं आपली सुरूच असतात, दिवाळी असो वा होळी, रावांना भरवते प्रेमाने, ची गोळी.
मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर, …. यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
जिजाऊसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र,
……च्या गळ्यात बांधले मी मंगळसूत्र.

सातारला गेलो होतो आणला स्पेशल खवा
….. चा सहवास मला नेहमीच हवा.
चंद्र आहे रोहिणीचा सोबती,
……माझी जीवन साथी.
सायंकाळच्या आकाशाच्या निळसर रंग, पण,
…आहे घरकामात दंग.

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
……बरोबर बांधली जीवनगाठ.
जगाला सुवास देत उमलती कळी,
……नाव घेतो……वेळी.
मंद आहे वारा संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो ….. आणि माझी जोडी.
लग्नात लागतात हार आणि तुरे, …. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, …. बरोबर संसार करीन सुखाचा.
गावठी गुलाबाला सुगंध सुवास, …. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.
एका वर्षात असतात महिने बारा, …. च्या नावात समावलाय आनंद सारा..
चांदीचे जोडवे पतीची खूण, …. रावांचे नाव घेते ची सून.
नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व,
…… आहे माझे जीवन सर्वस्व.

मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा
….. ला विचारतो मी आती क्या खंडाळा?
घर असावं नेहमी क्लीन अँड नेट
…… आहे माझी सिम्पल अँड स्वीट.
राजकारणी लोक आणतात खरेपणाचा आव
….. च नाव घेतल्याशिवाय जायचं नाही मित्रांनी केला मज्जाव.

मनी असे ते स्वप्नी दिसे ओठी आणू मी हे कसे,
…माझी नववधू, शब्दात मी हे सांगू कसे.
मातीच्या चुली घालतात घरोघरी
….. झालीस तू माझी, आता चल माझ्या बरोबरी.
मायामय नगरी, प्रेममय संसार
….. च्या जिवावर माझ्या जीवनाचा भार.
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न – ११, घराला लावली घंटी,
…. माझी बबली आणि मी तिचा बंटी.
मुंबापुरची मुंबादेवी आज मला पावली
श्रीखंडाचा घास देताना …. मला चावली.

मुखी असावे प्रेम, हातामधे दया
… सोबत जोडली माझी माया.
मोठ्यांसमोर सर्वच गोष्टींत मी झालो पास
…. ला देतो गुलाबजामचा घास.
मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा
….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
मोहमाया – स्नेहाची जाळी पसरली घनदाट
…… बरोबर बांधली नवीन जीवनाची गाठ.
रखरखत्या वैशाखात प्रेमाचा घुंद वारा
जीवनाचा खेळ समजला … मुळे सारा.
रुप्याचा लोटा सोन्याची झारी
असली काळी सावळी तरीही …. माझी प्यारी.

नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड, … राणी माझा तळहाताचा फोड.
देवाला भक्त करतो मनोभारे वंदन, … मुळे झाले संसाराने नंदन.
चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा, … रावाच्या जीवावर … मारते मौजा.
श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन, … च्या सोबत आदर्श संसार करीन.
सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, … राणी माझी घरकामाता गुंतली.
आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन, माझ्या नावाचे… करी पुजन.

पुढे जाते वासरू, मागून येते गाय,
…ला आवडते नेहमी दुधावारची साय.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
….ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
लग्नात लागतात हार आणी तुरे
…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
वड्यात वडा बटाटावडा,
… मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
प्रसन्न वदनाने आले रविराज
… ने चालविला संसारात स्नेहाचा साज.
फुलासंगे मातीस सुवास लागे,
…. नि माझे जन्मोजन्मिचे धागे.

बंगलौर, म्हैसूर ,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास भरवतो …… बोट नको चाउ.
बकूळीच्या फुलांचा सडा पडे अंगणी
सौ….. आहे माझी अर्धांगिनी !!!!!
बहरली फुलांनी निशिगंधाची पाती
……. चे नाव घेतो लग्नाच्या राती.
भाजीत भाजी पालक,
… माझी मालकिन अन् मी मालक !
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे
… ला पाहून सूर्य चंद्र हसे.
रोज सकाळी उठुन पितो मी भरपुर पाणी, …… चे नाव घेता येते डोळ्यात पाणी.

Bhajit Bhaji Methichi, ………Majhya Pritichi.
काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध, … सोबत जीवनात मला आहे आनंद.
Kahi Shabd Yetat Othatun, …..Cha Naav Yet Matra Hrudyatun.
नंदनवनात अमृताचे कलश, … आहे माझी खुप सालस.
भाजीत भाती मेथीची, … माझी प्रितीची,
श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण, … ला सुखात ठेवीन हा माझी पण.
दही चक्का तुप, … आवडते मला खुप.

Kolhapurla Aahe Mahalakmicha Vas, …… Mi Bharavito Jalebi Cha Ghas.
देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, … शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
Puranpolit Tup Asave Sajuk, …… Aahet Aamchya Far Najuk.
स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान, …चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान,
अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, …. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.

निसर्गावर करू पाहत आहे आजचा मानव मात
अर्धांगिनी म्हणून …. ने दिला माझ्या हातात हात.
नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी
…. चे नाव घेतो … च्या घरी.
पाणीपुरी खाताना लागतो जोरदार ठसका,
… ला आवडते बिस्किट ब्रिटानिया मस्का – चस्का.
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
….. ची व माझी जडली प्रिती.
पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले
त्यावर सोन्याच्या अगंठीने …. चे नाव लिहिले.

इंद्राची इंद्रायणी दुष्यतांची शकुंतला,
.…नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.
नंदनवनात अमृताचे कलश
…. आहे माझी खूप सालस.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
…..झाली आज माझी गृहमंत्री !!!!!
निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान
…..चे नाव घेऊन राखतो तुमच्या सर्वांचा मान.
देवळाला खरी शोभा कळसाने येते.
……मुळे माझे गृहसौख्य खुलते / दुणावणे.

सत्कर्याची करावी नेहमीच पूजा
….. ला म्हटलं लवकर करूया लग्न आता मीच वाजवतो बॅण्ड बाजा.
ऑस्कर पारितोषिकासाठी पिक्चर निवडला श्वास
….. झाली माझी लाडकी राणी खास.
बशी मध्ये ठेवला गरम चहाचा कप
….. ला म्हटलं चल पिक्चरला स्टँड अप.

Romantic Ukhane For Female
पौर्णिमेची रात्र ,मंद मंद वाहतो वारा
….. चा स्वभाव मला आज तरी दिसतोय बरा.
आंबेवनात कोकीळा गाते गोड,
……आहे माझ्या तळहाताचा फोड.
शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता,
……राणी मिळाली स्वर्ग आला हाता.
मुखी असावे प्रेम हातामध्ये दया,
……वर जडली माझी माया.

ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला.
……च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.
काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,
……जीवनात मला आहे आनंद.
बशीत बशी कप बशी,
….. सोडून बाकी सगळ्या म्हशी.

Modern Marathi Ukhane For Female
गार गार माठामधले पाणी ताजे ताजे… …. राव माझ्या मनाचे झाले राजे.
काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार…
…. राव शिकलेले आणि मी अडाणी गवार.
इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात ना हो मून … रावांचं नाव घेते ची सून.

मातीच्या घराला, दरवाजे लाकडाचे…
…. च नाव घेते, तोंड आठवून …. चे.
देवापुढे लावली समईची जोडी,
….रावांमुळे आली आयुष्याची गोडी.
निळ्या आकाशात चमचमते तारे,
….रावांचे नाव घेते, लक्ष द्या सारे.
आईने केले संस्कार, बाबांनी बनवले सक्षम
….रावांच्या साथीने संसार होईल भक्कम.
श्रावणाच्या आगमनाने, बहरली कांती
…रावांच्या संसारात, मिळो सुखशांती.
मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ
….रावांमुळे आला जीवनाला अर्थ.
आतून मऊ, बाहेर काटेरी साल ….दिसले खडूस तरी मन मात्र विशाल.
गार गार माठामधले, पाणी ताजे ताजे
….राव झाले माझ्या मनाचे राजे.
मनी माझ्या संसाराची आहे आस
….तू फक्त गोड हास.
माझी आणि ….रावांची जमली जोडी
सर्वांनी येऊन वाढवा लग्नाची गोडी.
नव्या कोऱ्या रूळांवर, ट्रेन धावते एकमद फास्ट
…राव चला पिक्चरला, पकडू सीट लास्ट.

Modern Marathi Ukhane For Male
आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल, … रावांच्या जीवनात… राहील खुशाल.
हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी, … झाली आता माझी सहचारिणी.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
…. रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.
अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
…. रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.
पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
…. रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.
यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
…. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
…. रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.
वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात, ….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
बारीक मणी घरभर पसरले, …. साठी माहेर विसरले.
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
…. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, …. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.
लग्नात लागतात हार आणि तुरे,
… च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
… रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
Marathi Ukhane For Bride
परसात अंगण, अंगणात तुळस,
…. नाव घ्यायचा मला नाही आळस.
जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला,
एवढे महत्त्व कशाला __च्या नावाला.
रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,
… च्या साथीने आदर्श संसार करीन.
लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,
बदलावा लागतो स्वभाव, …. च्या घरी मिळेल
माझ्या कलागुणांना वाव.
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,
…. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.
नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी च्या जीवनातही गृहिणी.
हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
अथांग वाहे सागर संथ
चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो
…. नी माझी जोडी.
चांदीचे जोडवे पतीची खूण, …. रावांचे नाव घेते …. ची सून.
कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,
…. रावांचे नांव घेते, सारे जण बसा.
पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,
….रावांच्या जीवनात टाकते मी पाहिले पाऊल.
पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
…. रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.
रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
…. रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.
दारी होती तुळस, तिला घालते होते पाणी आधी होते आई बाबांची तान्ही, आता झाले …. ची राणी. सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, रावांचे नांव घेते, _च्या घरात.
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
…. रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,
…. रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.
रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.
Funny Ukhane In Marathi
आला आला उन्हाळा ।
संगे घामाचा ह्या धारा …. रावांचे नाव घेते
लावून AC चा थंड वारा.
संसाराच्या सागरात पतीपत्नी नावाडी
…मुळे लागली मला संसाराची गोडी.
संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
साथ आहे माझ्याबरोबर …… सारखी सूर्यकांता !!!!!
संस्कृत काव्यात श्रेष्ट आहे जयदेवाच गीतगोविंद,
………च्या नावाचा लागलाय मला छंद.
आज आहे शनिवार
उद्या येईल रविवार
…. ची करते संसार
घडवू सुखाचा परिवार.
आघाडीत बिघाडी
युतीत चाललये कुस्ती
…. रावांची कायमस्वरूपी
माझ्या हृदयात आहे वस्ती.
आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
…. रावांचे नाव आयकायला
झालाय गांव गोळा सारा.
आज सुरु होईल IPL ची कम्माल
घरो घरी मग क्रिकेट चीच धम्माल
रोज संध्याकाळी घर होणार एक क्रीडांगण
कारण …. आणि माझ्यात सुरु होईल भांडण.
इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच कवर
…. याचं नाव घेते …. रावांची लवर.
गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
…. रावांशी लग्न करताच झाली मला ४ मुले.
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
…. घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!
स्टुलावर स्टूल बत्तिस स्तुल
….. राव एकदम ब्यूटिफुल.
ईन मीन साडे तीन …
ईन मीन साडे तीन …
…. माझा राजा ….
मी झाले त्याची QUEEN !
comedy marathi ukhane
केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी
तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत
…. राव आहेत खूप हौशी .
नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
….. बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार…..!!
जीवन आहे एक अनमोल ठेवा, …. आणतात नेहमी सुकामेवा.
डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया …. रावांना पहिल्यांदा बघताच. झाला मला लवेरिया
चंदनी पानात मुग्ध कळी हसली …. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात ।
…. रावांशी जुळली नाळ संपेल अंतर झोक्यात.
ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून
भरला १०० रु दंड …।
…. रावां ना भरवते Ice-cream चा घास
सांगा आहे कि नाही थंड ?
टीप टीप बरसा पानी
पानी ने आग लगायी
…. रावांशी लग्न करण्याची
लागली होती भलतीच घाई.
बागेमध्ये असतात, गुलाबाच्या कळ्या
…रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या.
पुरणपोळीत तूप असावे ताजे आणि साजूक
आमचे….राव तर आहेत खूपच नाजूक.
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
….राव परतले नाहीत, कुठे पिऊन पडलेत की काय?
रेशमाचा सदरा, त्याला प्लास्टिकचे बक्कल
आमचे…राव आहेत हँडसम, पण डोक्यावर मात्र टक्कल.
नाव घ्या नाव, सगळे झाले गोळा,
….रावांचं नाव आहे, एक लाख रूपये तोळा.
पाव शेर रवा, पाव शेर खवा
….रावांचे नाव घेते, समोर हजार रूपये ठेवा.
सचिनच्या बॅटला नमस्कार करते वाकून
…रावांचे नाव घेते पाच गडी राखून.
चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा
मी आहे म्हैस तर…राव आहेत रेडा.
उंच उंच डोंगर हिरवे, त्याला टेकतं आभाळ,
….रावांचे नाव काय घेऊ…कपाळ???
एक होती चिऊ, एक होता काऊ
….रावांचे नाव घेते, आता डोकं नका खाऊ.
खोक्यात खोका टिवी चा खोका,
….. माझी मांजर आणि मी तिचा बोका.
लग्नात मागितला हुंडा एक खोक्का
….. रावांचे नाव घेते ….. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का!
कौरव-पांडव यांच्यातील युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…… राव माझे आहेत फार निस्वार्थी.
बागेत बाग राणीचा बाग…
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!
आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा
….. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.
गोड करंजी सपक शेवाई ….
होते समजूतदार म्हणून करून घेतले जावई.
चांदीच्या ताटात फणसाचे गरे
….. राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे.
सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले,
गटारात पडले की काय?
आंब्यात आंबा हापुस आंबा
अन आमची……. म्हणजे जगदंबा.
नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
…..रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर.
नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
….. रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा.
महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड् …..
रावांना डोळे मारण्याची लई खोड्.
अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका.
पाव शेर रवा पाव शेर खवा
….. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी …..
रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी.
मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,
….. हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर.
निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट ….. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.
जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा.
मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
….. च नाव घ्यायला मला नाही आळस्.
ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
….. ला पाहून माझ डोक दुखत.
नुकताच सचिन आलाय सेंचुरी मारून…..
अन बाबऊरावांचं नाव घेते चार गडी राखून!!!
नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
…… राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात.
शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड
….. चे नाव घेते….. आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.
चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.
ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून भरला १०० रु दंड
….. रावांना भरवते Ice-cream चा घास सांगा आहे कि नाही थंड ?
श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा,
….. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
सकाळी सकाळी बागेत तोडत होते काळ्या
….रावांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या.
महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी, महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी
…….रावांचे नाव घेते, आयताचे क्षेत्रफळ – लांबी गुणिले रुंदी.
चांदीच्या किचन मध्ये सोन्याच्या ओटा
……..चे नाव घेते, केसात माझ्या हजार पाचशेच्या नोटा.
तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला LAVA
तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला LAVA
नंतर ती त्याला फोन करून म्हणते, धन्यवाद भावा.
निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान
……..रावांचा आवडता छन्द म्हणजे सतत मदिरापान.
सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन
तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना माझ्यासाठीही दोन साड्या आणि चार ड्रेस घेईन.
पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहते रजनी
…. चे नाव घेते मी त्यांची साजणी.
अंगणात लावली फुलझाडे, कुंडीत लावली तुळस
…. चे नाव घ्यायला कसला आलाय आळस?
तेलाच्या दिव्याला तुपाची वात
……. रावांशी केले लग्न, आता आयुष्याची वाट.
काश्मीरहून आणलाय रेशमी सुंदर रुमाल
…. बरोबर असले की हवाय कशाला हमाल.
रंगीत सुंदर हरणाचे फेगडे फेगडे पाय … राव आजून नाही, कुठे पडले की काय?
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, …. चे नाव घेतो …. रावान् चा पठ्ठा.
सासऱ्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी, पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.
वड्यात वडा बटाटा वडा, …….रावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
…. हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्.
चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे
सचीनच्या बॅटला करते नमस्कार वाकून, …. चे नाव घेते पाच गडी राखून.
एक होती चिऊ एक होती काऊ, …. चे नाव घेते , डोक नका खाऊ.
लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास, अन …. च्या घशात अडकला घास.
कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र, …. नी माझ्या गळ्यात बांधले मंगळ्सूत्र.
पावाबरोबर खाल्ले अमूल बटर, …. चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर.
रेशमी सदर्याला प्लास्टीकचे बक्कल, …. ना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.
रेडिओ मीर्ची एकते कानात हेडफोन टाकून
…. रावांना मिस कॉल देते १ रुपया राखून.
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
… रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव.
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा
…. रावांना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
…. राव हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड.
साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरांचा मसाला
………. नाव घ्यायला आग्रह कशाला..
वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ…..सोबत सुरु केला नवीन जीवनाचा प्रवास !!!!!
शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
….च्या प्राप्तीने माझे भाग्य उदयाला आले.
शेतात नांगरता नांगरता सापडली कवडी ||
……. माझ्या गुडघ्या एवढी ||
श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण
… ला सुखात ठेवी हा माझा पण.
श्री गणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून
……माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.
संतांचे वाङमय म्हणजे ‘सारस्वताचा सागर’
… म्हणजे प्रेमाचा आगर.
सोन्याची सुपली, मोत्यांनी गुंफली
… राणी माझी घरकमात गुंतली.
सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात
…. चे नाव घेतो …. च्या घरात.
स्वतंत्र भारताची तिरंगा ध्वजाने वाढवली शान
…… चे नाव घेतो ठेवून सर्वांचा मान.
हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ…..चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!!
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
…. च्या जीवनात मला आहे गोडी.
वर्षाचे महिने बारा,
….या नावात सामवलाय आनंद सारा.
सायंकळीच्या आकाशाचा निळसर रंग
आणि …… असते घरकमात दंग.
सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ…..चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!
सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
….. आहे मला अनुरूप.
सिद्धिविनायकाच्या देवळाला सोन्याचा कळस
….. चे नाव घ्यायला मला नाही आळस.
सुराविना कळला साज संगीताचा,
……… नावात गवसला अर्थ जीवनाचा.
हिरवळीवर चरते सुवर्ण हारिणी
… झाली आता माझी सहचारिणी.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
…..चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!
इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!
Chavat Marathi Ukhane
लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास
बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
…. रावं बिड्या पितात संडासात बसून
डाळित डाळ तुरीची डाळ
…. मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
…. रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ
सचिन च्या बॅटला करते नमस्कार वाकून
…. रांवाचे नाव घेते पाच गडी राखून!!
चांदिच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ
पावाबरोबर खाल्ले अमुल बटर…
…. चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर
नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चूका,
…. चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका.
चांदिच्या परातीत केशराचे पेढे
आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे.
साखरेचे पोते सुई ने ऊसवले,
…. ने मला पावडर लाऊन फसवले
आंब्यात आंबा हापुस आंबा अन, आमची …. म्हणजे जगदंबा
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, …. माझी बायको आहे मोठी लुच्ची.
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
शोएबच नाव घेते , नवरा माझा SECOND HAND.
यशोमती मैया से बोले नंदलाला, …. च नाव घेतो ,लाईफ झिंगालाला.
भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
…. च्या जीवावर करते मी मजा.
इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर ,
…. रावांचे नाव घेते राम रावांची लव्हर.
एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल
जेंव्हा आहेत …. राव , मग कशाला हवा हमाल.
रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
…. राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.
MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…
लग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…!
चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.
*रांवाची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
Short Marathi Ukhane For Bride
सासरची छाया, माहरेची माया,
….राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया.
हिरव्या साडीचा, पिवळा काठ भरजरी,
…रावांचे नाव घेतल्यावर, चेहऱ्यावर येते तरतरी.
पैठणीवर शोभते, नाजूक मोरांची जोडी
…रावांमुळे आली, आयुष्याला गोडी.
सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण,
…रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.
चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा,
…रावांचे नाव घेते, आशिर्वाद तुमचा सर्वांचा.
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं
…रावांचे नाव, माझ्या मनात कोरलं.
चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
…रावांचे नाव घेते देवापुढे.
शेल्याशेल्याची बांधली गाठ
…रावांचे नाव मला अगदी तोंडपाठ.
बारीक मणी घरभर पसरले
…रावांसाठी मी माहेर विसरले.
इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून
…रावांचं नाव घेते….ची सून.
सीतेसारखे चारित्र्य रंभेसारखे रुप,
……..मला मिळाली आहे अनुरुप.
वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,
…….. आहे माझी सर्वात सुंदर.
श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येतील नटून,
……माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.
स्वतंत्र भारताची राजधानी झाली दिल्ली
….. म्हणजे माझ्या रुदय कुलपाची किल्ली.
वाट चुकलेल्या वासराला नसतो कोणी धनी
….. चे रूप सदैव असते माझ्या ध्यानीमनी.
काळोखी रात्र संपली ,धावत आली उषा
….. च्या सहवासात प्रीतीची चढली नशा.
असावी नेहमी हसतमुख ,बोलणे असावे गोड
….. च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ.
अंगणामध्ये चिमण्या चिवचिवाट करतात
….. चे हट्ट पुरवताना माझ्या नाकी नऊ येतात.
इंग्रजी भाषेमध्ये झोपलेला शब्द आहे हट
….. च्या नावासाठी करू नका कटकट.
सोन्याचा कप आणि चांदीची बशी
….. माझी आहे जणू काही उर्वशी.
पिवळ्याधमक हापूस आंबा फळांचा राजा
….. च्या प्रीती मध्ये जीव अडकला माझा.
भक्ती तेथे भाव ,भाव तेथे कविता
….. च्या नावाचा जप करतो येता-जाता.
श्रीकृष्णाच्या बाललीला यशोदेला सोडतात हसवून
….. ला नेतो हनीमून साठी विमानामध्ये बसवून.
लोकलचा प्रवास करतो फर्स्टक्लास मध्ये बसून
….. ला पडली भूल आली प्रेमात फसून.
संसाराच्या डायरीमध्ये सुख करावे जमा
….. ला म्हटलं चल पिक्चरला, लवकर कर जामानिमा.
लग्न ठरलं, हळद लागली, हातावर रेखली मेहंदी ….. च्या सौंदर्याने मी झालो जायबंदी.
असं म्हणतात प्रेम दिल्याने प्रेम वाढते
….. सारखी पत्नी मिळायला मोठे भाग्य लागते.
काळोख्या रात्री आकाशात फुलल्या चांदण्या
….. शी लग्न करण्यासाठी केल्या दाताच्या कण्या.
मोबाईल घेतला नवीन सारखे करतो एस एम एस
….. आज झाली माझी मिसेस.
दारातल्या मोगर्याचा चढवला मांडवावर वेल
….. च्या साथीने संसारात आहे ऑल वेल.
नक्षीदार बाऊलमध्ये ठेवल्या आंब्याच्या फोडी
….. च्या सहवासात रात्र झाली थोडी.
अहो, वाट पहात होतो कितीतरी दिवस, दाद देईना कसली
पण आज मात्र….. माझ्या जाळ्यात फसली.
नेहरुंच्या शर्टवर लाल गुलाबाचे फुल
….. च्या सौंदर्याचे पडली मला भूल.
नाव घे ,नाव घे ,आग्रह करू नका
….. च नाव घेण्याचा प्रसंग आलाय बाका.
खडीसाखरेचा खड़ा खावा तेव्हा गोड
………च्या रूपात नाही कुठेच खोड
उखाण्याचा चाललाय आग्रह, मारीन म्हणतो बाजी
….. च नाव घ्यायला झालो मी राजी.
रुक्मिनीने पण केला कृष्णाला वरीन,
………… च्या साथीने आदर्श संसार करीन.
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने-फुले,
………च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.
जुन्या पद्धतीच्या विवाहात, शृंगाराची अनोखी फल,
…….. चा घास देतो माझ्या प्रिय…….. ला.
………माझे पिता………माझी माता,
शुभमुहूर्तावर आणली ………ही कांता,
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
………ना घेऊन सोडतो कंकण.
Gruhpravesh Ukhane For Navri
जमले आहेत सगळे, …. च्या दारात …. रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.
रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
…. रावानच नाव घेते सोडा माझी वाट.
लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल …. च नाव घेते, वाजवून …. च्या घराची बेल.
माहेरी साठवले, मायेचे मोती ….
च नाव घेऊन, जोडते नवी नाती.
ची लेक झाली, ची सून, …. च नाव घेते, गृहप्रवेश करून !
हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
…. रावाचे नाव घेते सत्यनारायनाच्या दिवशी.
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
…. नाव घेते सोडा माझी वाट.
आकाशाच्या प्रांगणात ब्रम्हा विष्णू आणि महेश,
…. रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.
शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,
आता …. राव माझे जीवनसाथी.
वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल,
…. रावांच्या जीवनात टाकले मी पाऊल.
सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
…. रावांचे नांव घेते, …. च्या घरात.
फुल फुलावे रानोरानी स्वप्न गहिरे दिसावे
…. रावांच्या सुखात माझे सुख असावे.
जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन,
विचार करते मुक होऊन, घडविले
देवांनी …. रावांना जीव लावून.
सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी,
…. चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.
लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेलच घेते, वाजवून …. च्या घराची बेल.
Makarsankranti Marathi Ukhane
सासु आहे प्रेमल ननंद आहे हौशी ….. रावांचे नाव घेते मकर संक्रांति च्या दिवशी.
कोल्हापूरचा चिवडा,
लोणावळ्याची चिक्की,
……रावासमोर सर्व दुनिया फिकी.
हिवाळ्यात लागते थंडी, उन्हाळ्यात लागते ऊन…… रावांच नाव घेते …..सुन..
हिमालय पर्वतावर बरफाच्या राशि… रावाचं नाव घेते मकरसंक्रांति च्या दिवशी…
मंगलकार्याची खूण म्हणजे दाराला तोरण…
…रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण
पेरूच्या झाडावर पोपट बसले पंगतीला,
……रावांचे नाव घेते,
सुहासिनीच्या संगतीला
नाव घ्या. नाव घ्या. आग्रह. असतो सर्वाचा,
….. रावांचे नाव. असते. ओठावर. पण प्रश्न. असतो. उखाण्याचा
वाण घ्या वाण संक्रांतीचे वाण…..
…..रावामुळे मिळतो हळदी कुंकुवाचा मान
उन्हाळ्याच्या वेळेला पाणी टाकते केळीला …..रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळेला
रुसलेल्या राधेला क्रीषण म्हणते हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास.
गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत
…..रावांच नाव घेते संक्रातच्या पुजेत
निसर्ग निर्मिती च्या वेळी
सूर्यनारायण झाले माळी
…. चे नाव घेते संक्रातीच्या वेळी
तिळाचा स्नेह गुळाची गोडी,
सदा सुखात राहो ……. जोडी.
तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत,
…….रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाच गुपित.
नवीन वर्ष सण पहिला मकरसंक्रातीचा मान
हळदीकुंकूवाचा मान सुवासिनींचा.. आणि ………’चा जोडा राहो साताजन्माचा.
संक्रांतीचा जन्म माझा,….. रावांचे नाव घेवून वाटते तिळगुळाचा गोडवा.
संध्याकाळच्या वेळी सूर्याला चढली लाली …..रावांच्या संसारात मी आहे भाग्यशाली
कुकू लावते ठळक हळद लावते किचीत ….. राव हेच माझे संचित.
तिळगुळ घ्या गोडगोड बोला
…. शी लग्न झाले वर्ष झाले सोळा.
अबोलीच्या मुग्ध काळ्या सांगून गेल्या मनीचे
…..च नाव घेते सानिध्य आहे मकरसंक्रांतीच्या हळदी कुंकवाचे…….???
तिळगुळ घ्या आली संक्रांत
…. शी झाले लग्न स्वभावाने फारच शांत.
तिळगुळ घ्या गोड बोला भांडू नका कोणी.
…….रावांची ……मी राणी
तिळगुळ घ्या आली संक्रांत
…. शी झाले लग्न महाराष्ट्र माझा प्रांत.
समोर होती देवळी
देवळीत होते वाटी
वाटीत होते आवळा आवळी
…ने पीचर दाखवले पळवापळवी.
यमुनेच्या पाण्यात ताजमहालाची सावली
…. ना जन्म देऊन धन्य झाली माउली
निसर्गाच्या सानिगध्यात निशीगंध झाला मोहीत ……
रावांच आयुष्य मागीतले सासू सासऱ्या सहीत
तिळगुळ घ्या आली संक्रांत
…. माझ्याबरोबर मला कसली भ्रांत
हिमालय पर्वतावर बरफाच्या राशि…
रावाचं नाव घेते मकरसंक्रांति च्या दिवशी.
घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण ,
……रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण
तिळाच्या लाडू सोबत देते काटेरी हलवा,
…..चे नाव घेते त्यांना लवकर बोलवा.
मुकेश आंबानीच्या बायकोचा संक्रांतीचा उखाणा.
तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान
…चे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण.
रेडमी घ्या… ओप्पो घ्या,
की मोबाईल घ्या वीवो,
मुकेशरावांचे नाव घेते फुकट वापरा जीओ.
संसारुपी सागरात पती असावे हौशी …….
रावच़ नाव घेते संक्रांतीदिवशी.
तिळासारखा स्नेह. गुळासारखी गोडी. …..
रावांच नाव घेते. सुखी असावी जोडी.
नंदन वनात नाग नागिणीची वस्ती ……. राव यांना आयुष्य मागते माझ्या पेक्षा जास्ती.
संसार रुपी करंजीत प्रेम रुपी सारण …….
रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकू चे कारण.
संक्रांतीच्या सणाला नटुन थटुन करते वानववसा
………रावांनी आनंद सुखाने भरुन दिला पसा.
संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात ….
रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात.
माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची ,
….रावांचे नाव घेतेय,संक्रांति च्या दिवशी.
हळदी कुंकु घेतले चाँदीच्या ताटी,
……. ची जोड़ी अशी जशा जुळून येती रेशीमगाठी
तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात,
…. चं नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.
सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,
…. नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.
गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी,
…. चे नाव घेते तिळसंक्रांतीच्या दिवशी.
पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते,
चातकपक्षाची काया,
….रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया ..!
तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा,
…. नाव घ्यायची हीच तर खरी वेळा.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
मंगळागौरीच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी
…रावांचे नाव घेते, पाडवा सणासाठी!
चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
…रावांचे नाव घेते देवापुढे
संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा
…रावांचे नाव घेऊन, आशिर्वाद मागते सौभाग्याचा
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,
…….रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
…… रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.
हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
…. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!
चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
…. चं नाव घेते देवापुढे.
हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
…. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.
मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,
…. यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
…. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात
..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात
..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात
.. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!
घातली मी वरमाला हसले …. राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
शेल्या शेल्याची बांधली गाठ,
…….नाव मला तोंडपाठ.
वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
…. च्या सवे चालते मी सप्तपदी… !!
गावठी गुलाबाला सुगंध सुवास, …. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……
सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, …
दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात,
अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, …
च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.
सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, …
माझी नेहमी घरकामात दंग,
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….
चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
अस्सल सोने चोविस कॅरेट, …
अन् माझे झाले आज मॅरेज.
जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, …
च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, …
च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.
जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसार रथावर … सारथी.
जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी …
म्हणजे लाखात सुंदर नार.
नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री, …
आज पासुन माझी गृहमंत्री.
काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात,
प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात.
रुप्याचा लोटा सोन्याची झारी,
असली काळीसावळी तर … माझी प्यारी.
वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,
…..आहे माझी सर्वा पेक्षा,
चंद्रला पाहून भरती येते सागराला,
……ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी,
…..च्या जीवनात मला आहे गोडी.
राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो
……ला लाडवाचा घास.
निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान,
……चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान.
मायामय नगरी, प्रेममय संसार,
……च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.
पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे,
……चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात,
… चे नाव घेतो … च्या घरात.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
……चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
एक होती चिऊ, एक होता काऊ,
……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
…..माझी सर्वांपेक्षा सुंदर.
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,
…. चे नाव घेतो…..च्या घरात.
टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा,
… चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन,
… च्या साथीने आदर्श संसार करीन.
निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी,
… चे नावं घेतो… च्या घरी.
श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी,
… च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
…..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका,
…चे नाव घेतो सर्व जण ऐका.
जगाला सुवास देत उमलली कळी,
भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी.
उगवला सुर्य मावळली रजनी, … चे नाव सदैव माझ्या मनी.
हत्तीच्या अंबारीला मखमली झुल,
माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.
लग्नाचा वाढदिवस करु साजरा,
.. तुला आणला मोग-याचा गजरा.
सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल,
संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.
पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे,
ते नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे,
कोरा कागज काळी शाई,
… ला रोज देवळात जाण्याची घाई.
कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, … देतो मी लाडवाचा घास.
खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन,
आमच्या …. नाव घेतो गेट टू द सेफ झोन.
आंबा गोड, ऊस गोड,
त्याहीपेक्षा अमृत गोड,
…..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.
चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण ….. होती माझ्या हृदयाची किल्ली.
पाच बोटातून होते कलेची निर्मिती,
…. वर जडली माझी प्रीती.
तू पुण्याची मिसळ,
मी मुंबईचा वडापाव,
लग्नाला हो म्हणायला …. खाल्ला जास्तच भाव.
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,
…. च्या नादाने झालो मी बेभान.
अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम,
….. नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम.
केसर दुथात टाकलं काजू,
बदाम, जायफळ,
….. नाव घेतो,
वेळ न घालवता वायफळ.
काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
…..चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.
संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,
माझी …. म्हणते मधुर गाणी.
वादळ आलं,
पाऊस आला,
मग आला पूर …..नाव घेतो,
भरून तिच्या भांगेत सिंदूर.
श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा,
आमच्या ….. आवडतो गरमगरम बटाटेवडा.
Nice post thanks for the information